मंगळवार पेठेत दिसतेय जाधव कुटुंबीयांच्याप्रती प्रेम
schedule09 Jan 26 person by visibility 67 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंगळवार पेठ परिसर हा जाधव कुटुंबीयांचा होमग्राऊंड. पेठेतील प्रत्येक कार्यक्रमात जाधव कुटुंबीयांचा सहभाग. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रासाठी या कुटुंबांकडून नेहमीच प्रोत्साहन. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव, राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार संभाजीराव जाधव यांनी सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविलाय. जाधव कुटुबीयांचा मंगळवार पेठवासियासोबत जुळलेला स्नेह आणि प्रेमाची प्रचिती प्रचारा दरम्यान येत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार जयश्री जाधव यांनी प्रचारफेरी काढली. माजी आमदार जयश्री जाधव, उमेदवार सत्यजीत जाधव यांनी मंगळवार पेठेतील विविध भागात प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तस्ते गल्ली, देवणे गल्ली, प्रॅक्टिस क्लब परिसरात निघालेल्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदारांनी, जाधव कुटुंबीयांच्या विविध क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. महायुतीचे उमेदवार निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, यशोदा मोहिते यांनी प्रचारफेरीत सहभागी होत मतदारांशी संपर्क साधला. प्रभाग क्रमांक तेरामध्येही महायुतीच्या उमेदवारांनी विविध भागात रॅली काढली. शिवसेनेचे उमेदवार ओंकार जाधव यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.