स्वरुप कदम ठरतोय मतदारांच्या पसंतीचा चेहरा
schedule09 Jan 26 person by visibility 190 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्चशिक्षित व तरुण नेतृत्व, स्वच्छ व स्पष्ट भूमिका आणि प्रभागातील सोयी सुविधासाठी काम करण्याची तळमळ…यामुळे प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुतीचे उमेदवार स्वरुप सुनील कदम हे मतदारांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रचार कालावधीत त्यांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण गटातील ते उमेदवार आहेत. या प्रभागात शिवसेनेने त्यांच्या माध्यमातून नवीन चेहरा दिला आहे. हा तरुण चेहरा प्रभागातील नागरिकांच्यासाठी काम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. पहिल्यापासूनच कदम कुटुंबीय सामाजिक व राजकीय क्षेत्रात. कदमवाडी, भोसलेवाडीसह आसपासच्या भागात नित्याचा संपर्क. सारा परिसर ओळखीचा. लोकांच्या अडीअडचणींची जाणीव. प्रभागातील गरजा माहित…नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही देत स्वरुप कदम हे प्रचार करत आहेत. वैयक्तिक गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्यासमोर विकासासाठी काम करण्याची भूमिका मांडत आहेत. त्यांची भूमिका लोकांना पटत आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. रोज नववीन भागात संपर्क फेरी काढून मतदारांना जोडत आहेत. प्रभाग क्रमांक दोन हा संमिश्र लोकवस्तीचा. शहरी आणि ग्रामीण तोंडवळा लाभलेला. या भागातील नेमक्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याची हमी ते मतदारांना देत आहेत. यामुळे हा तरुण चेहरा मतदारांच्या पसंतीस उतरत आहे.