वांगी बोळ परिसरात उमा बनछोडेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule09 Jan 26 person by visibility 238 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क, प्रभागाती सोयी सुविधासंबंधी स्नेहपूर्ण संवाद, विश्वासाने व्यक्त करणारे नागरिक आणि त्यांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे चित्र आहे, काँग्रेसच्या उमेदवार उमा बनछोडे यांच्या वांगी बोळ परिसरातील प्रचारफेरीचे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सातमधून महाविकास आघाडीतंर्गत काँग्रेसकडून त्या लढत आहेत. सर्वसाधारण महिला ब गटातून त्यांची उमेदवारी आहे. प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी वांगी बोळ परिसरातून प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीत स्थानिक नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. महिला मतदारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. उमेदवार बनछोडे यांनी घर टू घर संपर्कावर भर दिला आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाविषयी आवाहन करत आहेत. उमा बनछोडे या २०१५ ते २०२० या कालावधीत महापालिकेत नगरसेविका होत्या. शहरवासियांशी निगडीत विविध विषयावर आवाज उठविला. अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग सातमधील सक्षम उमेदवार म्हणून समोर आल्या आहेत. त्यांनी प्रभागात संपर्क साधत नगरसेविका म्हणून केलेल्या कामांची मांडणी करत आहेत. या प्रचारफेरीत नागरिक त्यांच्याकडे प्रभागातील सोयी सुविधाविषयी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मतदान करण्याची ग्वाही देत आहेत.
………………..