गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील शिवसेनेत जाणार, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शनिवारी प्रवेश
schedule09 Jan 26 person by visibility 77 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे शनिवारी, (दहा जानेवारी २०२६) शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा कोल्हापुरात शिवसेनेत प्रवेश होत आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून राजकीय हालचाली सुरू आहेत. माजी चेअरमन पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत आहेत. पाडळी मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. गोकुळचे माजी चेअरमन हे जवळपास चार दशके गोकुळमध्ये सक्रिय आहेत. करवीर तालुक्यातील दूध संस्थांची ताकत त्यांच्या पाठीशी आहे. ते आतापर्यंत काँग्रेस सोबत होते. दरम्यान आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हाती धनुष्यबाण घेण्याचा निर्णय घेतला आहे.