Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदमशिक्षकांच्या पगाराला विलंब, प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा आंदोलनाचा इशारामहापालिका शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकरशहीद महाविद्यालयात ग्लोबल कोल्हापुरी संवाद : अमेरिकेत कार्यरत युवा आयटी तंत्रज्ञांची अनोखी मैफलजिल्हा परिषदेची निवडणूक दोन दिवसात जाहीर ?चांगभलं…जनसुराज्य लढविणार २९ जागा  ! अक्षय जरग, प्रसाद चव्हाण, सुभाष रामुगडेंची बंडखोरी! !उमा बनछोंडेनी दाखल केला उमेदवारी अर्जप्रभाग क्रमांक चारमधून योगिता प्रवीण कोडोलीकरांनी भरला अर्जमहायुतीच्या उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, मतदारांचा ओसांडणारा उत्साह ! मंत्री - आमदारांसह कार्यकर्त्यांनी धरलेला फेर ! !महायुतीचे उमेदवार घोषित, २३ नगरसेवकांचा समावेश ! शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल ! !

जाहिरात

 

आम्ही पाहिलाय काळ तुमच्या संघर्षाचा…म्हणूनच अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !! अमल महाडिक

schedule05 Dec 24 person by visibility 762 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (पाच डिसेंबर) शपथ घेतली. त्यांच्या निवडीचे सर्वजण स्वागत करत आहेत. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करताना त्यांच्याबद्दल भावना समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या आहेत. ’ आम्ही पाहिलाय काळ तुमच्या  संघर्षाचाम्हणूनच अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !! ’अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांची कारकिर्दीचा गौरव केला आहे.

महाडिक यांनी म्हटले आहे, “तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त जागा निवडून आणणारे नेतृत्व ठरले तरी आजही त्यांच पाय जमिनीवर होते. या सगळ्या प्रवासात वाट्याला आलेला संघर्ष, अपमान आणि मिळवलेल्या विजयाचा उन्माद त्यांच्या मनाला किंचितही शिवला नाही, हे त्यांच्या देहबोलीतून क्षणोक्षणी जाणवत होते. आणि म्हणूनच हा सोहळा याची देही याची डोळा पाहताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा अभिमानाने उर भरून आला. २०१४ मध्ये मी, पहिल्यांदा आमदार झालो. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या कामाचा आवाका किती प्रचंड आहे, याचा अनुभव खूप जवळून मी घेतला. पाच वर्षं आमदार म्हणून त्यांच्यासोबत काम करताना दक्षिणच्या जनतेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न मी केला.  त्यामागे प्रेरणा  त्यांची होती. राजकीय चिखलफेक कितीही झाली तरी आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून जनसेवा करत राहायची, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून आणि कर्तृत्वातून शिकवलं.

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत काही कारणांमुळे माझा पराभव झाला. पण तरीही न खचून जाता आलेला संघर्ष स्वीकारून ध्येयाकडे वाटचाल करत राहायची हे पुन्हा त्यांनी शिकवलं. निवडणुकीनंतर झालेल्या अभद्र आघाडीमुळे सर्वाधिक आमदार निवडून आणून सुद्धा ते विरोधी पक्ष नेते झाले. कितीही संघर्ष वाट्याला आला तरी संयम सोडला नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी राबत राहिले. आणि कदाचित यामुळेच अश्या कठीण काळातही भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार आणि नेता त्यांची साथ सोडून बाजूला गेला नाही. 

२०२२ मध्ये पुन्हा सत्तेची गणितं बदलली. आणि युतीत मोठा भाऊ असूनही उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी हसतहसत स्वीकारली. इथे पुन्हा त्यांच्या पक्षनिष्ठेचा परिचय अखंड महाराष्ट्राला झाला. वरिष्ठांनी सांगितलं तर घरी बसेन पण वेगळा विचार करणार नाही, या भूमिकेतून त्यागभावनेचीही प्रचिती झाली. विरोधकांनी खिल्ली उडवली तरी त्यांनी कधी आपल्या भाषेची पातळी सोडली नाही. ते फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करत राहिले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल डोळ्यासमोर ठेऊन पहा. देशात मोदीजींचं सरकार आलं पण महाराष्ट्रात महायुतीला अपयश आलं. आता महायुतीचं विधानसभेला काही खरं नाही अशा चर्चा सगळ्या माध्यमातून सुरु झाल्या.. पण तरी हा पठ्ठ्या खचला नाही. अख्ख्या महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना धीर देऊन पुन्हा लढण्याचं बळ द्यायचं काम केलं. आपल्या खासदारांची संख्या जरी कमी असली तरी आपला पराभव हा ०.०३ टक्के मतांनी झालाय, फेक नॅरेटिव्हमुळे झालाय आणि हे सगळं सुधारून आपण पुन्हा जिंकू शकतो, हे प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला जेव्हा त्यांनी पटवून दिलं. तेव्हा कुठेतरी मलाही वाटून गेलं की, अडचणीच्या काळात सैन्याला बिथरू न देता लढायची उर्मी द्यायला सेनापतीच खंबीर लागतो. आणि तो सेनापती त्यांच्या रूपाने आमच्याकडे आहे.  आज त्यांचा शपथविधी झाला पण माझ्यासह भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मुख्यंमत्री झाला. ही भावना मनात येते कारण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वागण्यातून आम्हाला प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. ” असे महाडिक यांनी नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes