औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी गरजेची - डॉ. एम. व्यंकट रमणा
schedule30 Jan 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ औषध निर्मिती आणि संशोधनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रायोगिक प्राण्यांची योग्य हाताळणी, त्यांचे ताणतणाव कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रयोगांचे अचूक व पुनरुत्पादक निष्कर्ष मिळवण्यासाठी नैतिक मुल्ये आणि कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. औषध निर्मिती आणि त्यांचा सुरक्षित वापर याबद्दल जनजागृती करण्यासाठी फार्मसी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे.’असे आवाहन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाचे (दक्षिण विभाग) उपाध्यक्ष डॉ. एम. व्यंकट रमणा यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्यावतीने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित ‘एक्स्पेरिमेंटल ॲनिमल हँडलिंग अँड एन्व्हायरन्मेंटल एनरिचमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय प्रायोगिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. रविकांत पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. आर. वाय पाटील, डॉ. प्रल्हाद वांगीकर, डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. आर. वाय. पाटील, डॉ. मिता बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर, डॉ. विश्वेश डांगे यांनी प्रात्यक्षिक सादर केली. शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. बलवंत चौरे, डॉ. ए. जी. ढवळशंख, डॉ. रविंद्र जरग, डॉ. संदीप पाटील, डॉ. चंद्रगौंडा पाटील हे मार्गदर्शन करणार असून डॉ. एन. एस. व्यवहारे, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. देवेंद्र शिरोडे, डॉ. स्मिता सदर हे प्रात्यक्षिक घेणार आहे.
डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनाली दिवटे आणि स्नेहल भोंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिनंदन पाटील यांनी आभार मानले. रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सी.डी लोखंडे, डॉ. अमृतकुवर रायजादे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. उमराणी जे. , रुधीर बार्देसकर, संजय जाधव, अजित पाटील, जयदीप पाटील उपस्थित होते.