+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule15 Oct 24 person by visibility 361 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. राज्यातील 288 विधानसभा जागेसाठी 9 कोटी 63 लाख मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषदे घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा. मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या मतदारासाठी घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध केली असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. व्होटर अॅप वर मतदार आपले सर्व माहिती तपासू शकतात. दरम्यान 26 नोव्हेंबर रोजी सध्याच्या विधानसभा सभागृहाचा कार्यकाळ संपणार आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष असणार आहे. पैसे, मद्य वाटप यावर नजर ठेवली जाईल. सर्वांनीच आचारसंहितेचे पालन करावे. निवडणुकीत मतदारांची भागीदारी आवश्यक आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होईल. 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जदारांची छाननी होईल. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.