+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule16 Oct 24 person by visibility 28 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झाला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना मुळीक यांनी, ‘महाविकास आघाडीने मला उमेदवारी द्यावी, मी सातत्याने लोकांसोबत आहे. शिव-शाहूंची विचारधारा जपणारा आहे.’असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना मुळीक म्हणाले, ‘ गेली अनेक वर्षे मी समाजकारणात आहे. अनेक माणसे जोडली आहेत. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी भेट घेतली आहे. महाविकास आघाडीकडून लढण्याची माझी तयारी आहे.’ याप्रसंगी गणी आजरेकर, सुनील जगताप, दगडू भास्कर, शाहीर दिलीप सावंत, शिरीष देशपांडे, डॉ. संदीप पाटील, सुनील कोल्हाटकर, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, शिवाजी माने, बाबासाहेब देवकर, टी. एस. कांबळे यांची भाषणे झाली. बबनराव रानगे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी कादर मलबारी, सोमनाथ घोडेराव, शंकरराव शेळके, महेश मछले, अशोक माळी आदी उपस्थित होते.