+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule22 Aug 24 person by visibility 372 categoryगुन्हे
हिंदी विभाग व एसयूके आरडीएफचा संयुक्त कार्यक्रम
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जगभरातील 'स्टार्टअप'च्या यादीत अमेरिका, चीननंतर भारत तिसऱ्या स्थानी आहे. प्रथमस्थान प्राप्तीसाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी सुरू केलेल्या 'स्टार्टअप' योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देत नवउद्योगांच्या स्थापनेसाठी शिवाजी विद्यापीठ कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य (आयआयएल) चे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी केले.
  हिंदी विभाग व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एसयूके आरडीएफ) च्या वतीने गुरुवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हिंदी विभागाच्या प्र. प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली, एसयूके आरडीएफचे संचालक डॉ. पी. डी. राऊत उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. राऊत यांनी एसयूके आरडीएफ व शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. आभार डॉ. प्रकाश मुंज यांनी मानले. यावेळी डॉ. सुषमा चौगुले, प्रा. अनिल मकर, श्रृतिका सरगर यांनी प्रश्न विचारले. या प्रसंगी इनक्यूबेटरचे मॅनेजर शिवानंद पाटणे यांनी विद्यापीठात सुरू असलेल्या नव उद्योजकांची माहिती दिली.यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. अक्षय भोसले, डॉ. गीता दोडमणी, प्रा. प्रकाश निकम, डॉ . जयसिंग कांबळे  उपस्थित होते.