जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक
schedule21 Oct 24 person by visibility 992 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूरतर्फे जिल्हा महासंघाची आढावा बैठक झाली. राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष चिलबुले यांनी, जिल्हा परिषद कर्मचारी *महासंघाने आज पर्यंत केलेल्या संप व आंदोलनामुळे सुधारित पेन्शन योजना, बालसंगोपन रजा, पाच दिवसाचा आठवडा, ग्रॅचुटीची मर्यादा चौदा लाखावरून वीस लाखावर झाली आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नती वेळेत मिळत नाही त्यामुळे दर 10 20 30 वर्ष चा लाभ सुद्धा महासंघाने शासनाकडून मंजूर केलेला आहे*. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील वेतन त्रुटीचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. सद्यस्थितीत लिपिक संवर्ग यांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. *लिपिक पदोन्नतीचे स्तर कमी करून लवकरच लिपिक संवर्ग वेतन त्रुटी प्रश्न मार्गी लावणार आहेत.’असे सांगितले.
सभेस जिल्हा महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, सचिव अजित मगदूम, आरोग्य संघटनेचे अध्यक्ष कुमार कांबळे, नर्सेस संघटनेचे अध्यक्ष मंगल पाटील, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष निलेश म्हाळुंगेकर, जिल्हा परिषद सोसायटी संचालक रणजीत पाटील, संजय शिंदे, संजय जाधव,अनिरुद्ध शिंदे महासंघ तालुकाध्यक्ष अश्विन धारवाडकर, अनघा पाटील,प्रतिमा पाटील रूपाली डोईफोडे, सुनील कोरवी जयकुमार शेळके, शैलेश पाटणकर उपस्थित होते.