+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule21 Oct 24 person by visibility 39 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इचलकरंंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी सोमवारी (२१ ऑक्टोबर) इचलकरंजी भाजपा कार्यालयात प्रवेश केला. याप्रसंगी विधानसभेच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल आवाडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपकडून उमेदवारी घोषित झाली आहे. 
 इचलकरंजी भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साही स्वागत केले. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, मौशमी आवाडे सोबत होते. या साऱ्यांचे आमदार जोल्ले व हाळवणकर यांनी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत केले. हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण आहे. या घटनेच्या माध्यमातून त्यांनी एकत्रितपणे आपल्या समर्थकांना एकता, विश्वास आणि प्रेरणा दिली.पस्थितांनी एकत्र येऊन या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला, ज्यामुळे आगामी निवडणुकीतील विजयाची आशा अधिक बळकट झाली. आवाडे यांच्या प्रवेशामुळे भाजपचे स्थानिक कार्य अधिक मजबूत होईल, आणि त्यांच्या नेतृत्वात समाजाच्या विकासासाठी नवे अध्याय लेखले जातील अशा भावना व्यक्त झाल्या. 
यावेळी  कल्लाप्पाण्णा आवाडे ज जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, भाजप जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, संघटकमंत्री मकर देशपांडे, शहर अध्यक्ष पैलवान अमृत  भोसले, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे,  विजया पाटील, प्रकाश दत्तवाडे, भाजप महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे, धोंडीराम जावडे, पांडुरंग म्हतुगडे, ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, बाळासाहेब कलागते, मिश्रीलाला जाजू, अहमद मुजावर, अनिल डाळ्या, अरविंद शर्मा, शहाजी भोसले, सतीश मुळीक, मनोज हिंगमिरे, उदय बुगुड, विजया पाटील, जयेश बुगड, बाळकृष्ण तोतला उपस्थित होते.