Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

जीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

schedule21 Oct 24 person by visibility 1299 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य कर (जीएसटी ) अधिकारी निवास श्रीपती पाटील  (रॉयल आस्टोनिया, न्यू पॅलेस मागे नागाळा पार्क) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई झाली. पाटील हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील आहेत.
 यासंबंधी माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे  ऑइल व ग्रीस रिपॅकिंग करण्याची कंपनी आहे. राज्य कर अधिकारी पाटील यांनी तक्रारदाराला कंपनीची कागदपत्रे जीएसटी विभागाचे नियमाप्रमाणे आहेत का याबाबत नोटीस पाठवली होती. त्यानंतर अधिकारी पाटील यांनी कंपनीस भेट दिली. कंपनीचा बँकेचा अकाउंट नंबर जीएसटी पोर्टलला नोंदवला नाही म्हणुन तक्रारदार यांना दीड ते दोन लाख रुपये दंड होईल. दंड नको असेल पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
तक्रारदारांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातरजमा केली. आणि कारवाई सुरू केली. राज्य कर अधिकारी पाटील हे तक्रारदारांकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes