दादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! !
schedule22 Oct 24 person by visibility 140 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, सहकार, राजकारण अशा विविध क्षेत्रात कर्तुत्वाची नवी छाप उमटविणारे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा २२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस.त्यांचे व्यक्तिमत्व हे आदर्शवत, विविध क्षेत्रातील कामगिरी अनेकांना प्रेरणादायी. डॉ. डी. वाय पाटील हे ‘दादा’ या नावांनी परिचित आहेत. त्यांच्या ९० व्या वाढदिनानिमित्ताने, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
आमदार पाटील यांनी म्हटले आहे, ‘आज २२ ऑक्टोबर... आमचे वडील डॉ. डी. वाय. पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. दादा...आपण जीवनात जे काही साध्य केले आहे ते आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायक आहे. आपण सुरु केलेली शैक्षणिक चळवळ, समाजसेवा आणि आपले उदार व्यक्तिमत्त्व हे आमच्यासाठी नेहमीच आदर्शवत आहेत.
आपल्या प्रेमळ मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला प्रेरणा मिळाली. आपण घालून दिलेला आदर्श आणि मूल्यांनीच लोकसेवेचा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाण्याची उर्जा मिळत राहते. दादा, आपल्याला निरोगी दिर्घायुष्य लाभो आणि आपल्या व्यक्तिमत्वातून समाजसेवेची प्रेरणा अशीच मिळत राहो हिच आई अंबाबाई चरणी प्रार्थना.!’