+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule11 Sep 24 person by visibility 295 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलेरोची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन युवक ठार झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले शुभम चंद्रकांत धावरे (वय २८वर्षे), आकाश आनंदा परीट (वय २३ वर्षे) आणि रोहन संभाजी लोहार ( २४ वर्षे) तिघेही तरुण सोळांकूर येथील आहेत. अपघातात गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे सोळांकूर गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातामध्ये चौघे गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार यांचा समावेश आहे.बुधवारी, मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघाताची राधानगरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सोळांकूरमधील सहा जण कामाानिमित्त दुपारी गारगोटीला गेले होते. सगळेजण काम संपल्यानंतर रात्री उशिरा गावाकडे परत येत होते. सरवडे-मांगेवाडी मार्गावर एका हॉटेलजवळ ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीघे जण जागीच ठार झाले. बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाला. दरम्यान पहाटेच्या सुमारास इस्पुर्ली येथे नागरिकांनी त्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.