शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार
schedule23 Jan 26 person by visibility 64 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणकुमार अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, "अमर रहे - अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, आवाज कुणाचा शिवसेनेचा" अशा घोषणा दिल्या. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. "छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी " अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, रत्नेश शिरोळकर, हर्षल सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शिवसेनेच्या शनिवार पेठेतील शिवालय कार्यालय येथे आमदार क्षीरसागर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नूतन नगरसेवक शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित जाधव, संगीता सावंत, वैभव माने, स्वरूप कदम, अर्चना पागर, प्राजक्ता अभिषेक जाधव, अजय इंगवले, अशकिन आजरेकर, अभिजीत खतकर, मंगला साळोखे, शीला सोनुले, कौसर बागवान, अनुराधा खेडकर आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी रणजीत जाधव, उदय भोसले, गजानन भुरके, कमलाकर जगदाळे, आनंदराव खेडकर, संजय सावंत, रमेश खाडे, पूजा भोर आदी उपस्थित होते.