कळंब्यात राजकीय घडामोडी ! काँग्रेसचे भोगम भाजपात, विनिता भोगमना जिल्हा परिषदेची उमेदवारी!!
schedule21 Jan 26 person by visibility 68 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी हालचाली वेगावल्या असताना बुधवारी, २१ जानेवारी २०२६ कळंबा येथे राजकीय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी काँग्रेसला धक्का दिला. बांधकाम व्यावसायिक रामचंद्र भोगम, कळंबा गावचे माजी सरपंच सागर भोगम व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रक्ष प्रवेश झाला. सागर भोगम हे काँग्रेसकडून माजी सरपंच होते. दरम्यान गेले काही दिवस येथे भाजपाकडून राजकीय हालचाली वेगावल्या होत्या. भोगम यांच्या पक्ष प्रवेशानंतर भाजपकडून विनिता सागर भोगम यांना कळंबा मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली.
जिल्हा परिषदेच्या कळंबा मतदारसंघ यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी माजी सरपंच सागर भोगम यांच्या पत्नी विनिता या इच्छुक होत्या. दरम्यान या ठिकाणी काँग्रेसने, जिल्हा परिषदेसाठी मनिषा अरुण पाटील टोपकर यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदारसंघात भाजपकडून संजीवनी पाटील, कळंबा येथील छाया भवड, मनीषा टोणपे, स्वाती पोवार या इच्छुक होत्या. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी राजकीय घडामोडी घडल्या. भोगम यांचा भाजपात प्रवेश झाला. सागर भोगम यांच्या पत्नी विनिता भोगम यांना कळंबा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
दरम्यान ‘भाजपच्या विकासाभिमुख धोरणांनी प्रेरित होऊन कळंबा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांसह त्या पक्षात जाहीर प्रवेश केला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये होत असलेल्या विकास कामांना सहकार्य करण्याची भूमिका घेत भाजपमध्ये सहभागी झाल्याचे यावेळी सागर भोगम यांनी सांगितले. याप्रसंगी प्रवीण साळोखे,उमेश साळोखे, दीपक चौगले, प्रकाश मगदूम,सुधीर पाटील, केरबा पाटील, अभिषेक पाटील, गिरीश पाटील, संदीप चव्हाण, रोहन बराले, जयदीप हूजरे, सागर कदम, अभिषेक भाट कार्यकर्ते उपस्थित होते.