डॉ. जे. के. पवार लिखित अमृतमहोत्सवी भारत ग्रंथाचे प्रकाशन
schedule21 Jan 26 person by visibility 40 categoryलाइफस्टाइलजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखक,प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित "अमृतमहोत्सवी भारत" या ग्रंथाचे प्रकाशन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, 'पानिपत'कार विश्वास पाटील यांच्या हस्ते पन्हाळा येथे झाले. स्वतंत्र भारताच्या गेल्या ७५ वर्षातील आर्थिक, सामाजिक, कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीचा आढावा डॉ. पवार यांनी या ग्रंथात घेतला आहे.
आपल्या देशाने गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखा-जोखा असलेला हा ग्रंथ विद्यार्थी, शिक्षक आणि प्रत्येक भारतीय माणसाला प्रेरणा देणारा ठरेल, असे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. लेखक डॉ. जे. के. पवार यांनी ग्रंथाविषयी माहिती दिली. विश्वास उनाळे-पवार यांनी सूत्रसंचालन केले. बी. ए. पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. शंकर गायकवाड, प्रा. एस. बी. बरगे, व्ही. जी. पाटील, दत्ता गायकवाड, सतीश कुलकर्णी, क्षमा कुलकर्णी, आशा जाधव-पाटील, नंदिनी रणखांबे, कांचन जोशी, आण्णा नालंग, किरण मोहिते, अजय कदम, ज्योती कदम, श्रीकांत मालंडकर, अरुण ठाणेकर, स्वाती लिमये, शैला जोशी, मीनल कुलकर्णी आदी उपस्थित होते.