+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule16 Oct 24 person by visibility 65 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : राज्य सरकारने सात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे विभागाच्या म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांची बदली पुणे येथे सहनोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक पदावर झाली. कोल्हापूर जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (नियोजन) या पदावर झाली. पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हा नियोजन अधिकारीपदी विजय भोपळे यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान अशोक पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पुणे म्हाडा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दीपक साकोरे यांची नियुक्ती झाली. मुंबई येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील उपसंचालक सुभाष बोरकर यांची बदली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त (प्रशासन) म्हणून झाली आहे. याशिवाय अजय सुभाष मोरे, समीक्षा चंद्राकार, प्रकाश अहिरराव, प्रवीण महाजन, अरुण आनंदकर या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.