वारणा विद्यापीठातर्फे पन्हाळा मोहिमेतून महाराणी ताराबाईंच्या इतिहासाचा जागर
schedule25 Dec 25 person by visibility 26 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर राज्याच्या संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त वारणा विद्यापीठातर्फे“पन्हाळा गिरीदुर्ग पदभ्रमंती मोहीम : शोध महाराणी ताराबाईंच्या इतिहासाचा” हा उपक्रम उत्साहात झाला. पन्हाळा येथे वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात वारणा विद्यापीठ अंतर्गत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय तसेच वारणा स्कूल ऑफ लॉ येथील सुमारे १०० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले
याप्रसंगी डॉ. शिर्के म्हणाले, “महाराणी ताराबाई या मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत कर्तृत्ववान, दूरदृष्टीच्या व धाडसी स्त्री शासिका होत्या. त्यांनी करवीर राज्याची स्थापना करून प्रभावी व सक्षम राज्यकारभार केला. त्यांचे शौर्य, पराक्रम व त्याग अतुलनीय आहे. विद्यार्थ्यांनी पन्हाळा गिरीदुर्गावरील ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून महाराणी ताराबाई यांचा इतिहास अभ्यासावा व त्यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घ्यावी.”
इतिहास अभ्यासक मानसिंग चव्हाण यांनी मार्गदर्शक म्हणून पन्हाळा किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. तसेच महाराणी ताराबाई यांचे कार्यकर्तृत्व, स्वराज्यासाठीचे योगदान व पन्हाळा गिरीदुर्गाचे ऐतिहासिक महत्त्व प्रत्यक्ष स्थळी समजावून सांगितले. प्रा. दिनेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे संयोजन वारणा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कक्षाचे संचालक डॉ. एन. एस. धाराशिवकर व यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. उमेश जांभोरे यांनी केले. यावेळी डॉ. ए. आर. भुसनर, डॉ. आर. डी. लिधडे, डॉ. संदिप जाधव, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. एम. एम. खुजत, प्रा. आर. बी. नाईक, प्रा. ए. एम. पाटील, प्रा. टी. के. शिकलगार, प्रा. आर. वाय. कुंभार, प्रा. प्रणव गुरव, आर. एस. भोपळे, एल. एस. करे, पन्हाळा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती जमदग्नी, पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती जयश्री पवार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास वारणा विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. सी. आर. जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. धेडे, डॉ. किरण पाटील ,सौरभ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संदिप जाधव यांनी आभार मानले.