Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावेशिवसेना ठाकरे पक्षाला महापालिकेत 12 जागा , काँग्रेस सोबत आघाडी गोकुळच्या दिनदर्शिकेतून उलगडतोय दुग्ध व्यवसाय,अद्ययावत माहिती  दूध उत्पादकांसाठी उपयुक्तएसफोरए लढविणार महापालिका निवडणूक - राजू मानेमंडल अधिकाऱ्याला २७ हजाराची लाच घेताना अटकमहाविकास आघाडी की स्वतंत्र ? शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी निर्णय, अरुण दुधवडकर करणार सतेज पाटलांशी चर्चाशिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरू, २७ जानेवारीपर्यंत मागविले अर्ज राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ४९ नगरसेवकांची  निर्दोष मुक्तताइंडिया आघाडीतून आप बाहेर, महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारामहापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात निश्चित , कोल्हापूर- इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणून लढणार : सतेज पाटील

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे पक्षाला महापालिकेत 12 जागा , काँग्रेस सोबत आघाडी

schedule24 Dec 25 person by visibility 429 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात यांच्यामध्ये एकमत झाले आहे. इंडिया आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी दिली. शिवसेनेला एकूण बारा जागा देण्यात येणार आहेत त्यापैकी सात जागा वर एकमत झाले आहे. पाच जागांवर अजून चर्चा सुरू आहे दरम्यान शिवसेनेने एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली आहे मात्र स्वीकृत नगरसेवक संदर्भात अद्याप निर्णय झाला नाही.
 आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, आमदार जयंत आसगावकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले, काँग्रेसचे  शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दौलत देसाई,  शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील मोदी, काँग्रेसचे पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, आनंद माने, भारती पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, तौफिक मुलानी, शिवसेनेचे नवेज मुल्ला, विशाल देवकुळे, महेश उतुरे, टेंबलाईवाडी येथील राजेंद्र पाटील  आदी पदाधिकाऱ्यांची हॉटेल अयोध्या येथे बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये एकत्र लढण्याचे ठरले आहे. शिवसेनेचा पहिल्यांदा 33 जागांचा प्रस्ताव होता. काँग्रेस समिती सोबत चार-पाच वेळा बैठका झाल्या. त्यानंतर 16 जागांची मागणी शिवसेनेने केली होती दरम्यान जो उमेदवार सक्षम आहे जिंकून येण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे अशांना उमेदवारी हा निकष लावून निवडणूक लढविण्यात येणार आहे.
 बुधवारी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चर्चेमध्ये शिवसेनेने 12 जागांची मागणी केली आहे. तसेच एक स्वीकृत नगरसेवकपद त्यांनी मागितले आहे. 12 जागांपैकी सात जागा वर एकमत झाले आहे. उर्वरित पाच जागांच्या बद्दल चर्चा सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसात त्या पाच जागांचा विषय निकालात निघेल असे आमदार पाटील यांनी सांगितले.राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष व डाव्या पक्षासोबत ही चर्चा सुरू आहे सगळ्या महाविकास आघाडीतील सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सक्षमपणे लढली तसेच महापालिका निवडणुकीत आम्ही एकसंधपणे उतरू असे आमदार पाटील यांनी सांगितले. आम आदमी पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केल्यामुळे आता त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रश्नच नाही असे आमदार पाटील म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes