महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य परीक्षा परिषदेतर्फेे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवींचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीमध्ये कोल्हापूर महापालिका शाळेतील चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ५२ विद्यार्थी चमकले आहेत. यामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरमधील तीन विद्यार्थी व जिल्हा गुणवत्ता यादीत चाळीस विद्यार्थी चमकले आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली होती. ३० एप्रिल रोजी अंतरिम निकाल जाहीर झाला होता. इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये टेंबलाईवाडी विद्यामंदिर येथील एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर पाच विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
नेहरुनगर विद्यामंदिरातील सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी येथील एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आहे.संबंधित शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांना यश आल्याची भावना व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, उपायुक्त साधना पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी प्रोत्साहित केले.
......................................................