+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule29 Sep 24 person by visibility 144 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  समाजात आकर्षक जाहिरातीमुळे तरुण वर्ग अतिशय कमी वयापासून व्यसनांकडे आकर्षला जात आहे. सरासरी एका वर्षात दारुमुळे तीस लाखांच्या आसपास तर तंबाखू सेवनामुळे अंदाजे ८० लाखाच्या आसपास जगभरात मृत्यू होत असून यातील भारतामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बाब असून याबाबत जाणीव जागृती व पर्यायाने निरोगी आयुष्य जगण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज आहे. असे मत डॉ. धीरव शहा यांनी व्यक्त केले. 
सायबर महाविद्यालयातील दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत व्यसनाधीनता व उपया या विषयावर कार्यशाळा आयोजति केली होती. याप्रसंगी डॉ. शहा बोलत होते. शहा हे मुंबई येथीलनसिक रोग तज्ञ व मेरी प्यारी जिंदगी या व्यसनाधीनतेच्या विरोधात काम करणाऱ्या मोहिमेत सक्रिय आहेत. ते म्हणाले
व्यसनांमुळे विविध सामाजिक समस्या जसे की गुन्हेगारी, अपघात,नैराश्य, आर्थिक दुर्बलता, सामाजिक प्रतिष्ठेची हानी या व अशा अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते यावर  सरकारी व स्वयंसेवी संस्थांच्या स्तरावर काही काम होत असून प्रमाणात होत असून त्यांची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. डॉ. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी डॉ.सोनिया राजपूत, डॉ. कालिंदी रणभरे यांनी मनोगते व्यक्त केली.  कोमल तायडे यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा वानखेडे यांनी आभार मानले.