+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule19 Oct 24 person by visibility 39 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात आजअखेर तीन लाख २१ हजार ६५९ इतके मतदार आहेत. मतदारसंघामध्ये ३५८ मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघण यांनी दिली. नवीन मतदार नोंदणीची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे.
 निवडणूक प्रकिया, मतदानाची केंद्राची माहिती यासंबंधी माहिती देताना सिंघण म्हणाल्या, ’करवीर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार संख्या एक लाख ६६ हजार ६८९ इतकी आहे. स्त्री मतदार संख्या एक लाख ५९ हजार ९७० इतकी आहे. १८ ते १९ वयोगटातील एकूण मतदाराची संख्या ८०१८ आहे. दिव्यांग मतदाराची संख्या २९७१ आहे. ८५ वर्षाहून अधिक वयोगटातील मतदारसंख्या ४१८१ इतकी आहे. मतदारसंघात तीन आदर्श मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी व माघार घेण्याचे ठिकाण बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे आहे.
पत्रकार परिषदेवेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार रुपाली रेडेकर, तहसिलदार बी. जी. गोरे, सोनाली माडकर, अलमास सय्यद आदी उपस्थित होते.