पंढरपुरातील कलाशिक्षण अधिवेशनात कोल्हापुरातील तीन कलाशिक्षकांना पुरस्कार
schedule05 Feb 25 person by visibility 624 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचा राज्यस्तरीय जीवनगौरव व आदर्श कला शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यातील तीन चित्रकार कलाध्यापकांना जाहीर झाला आहे. यामध्ये चित्रकार शिवाजी मस्के यांना जीवन गौरव पुरस्कार चित्रकार प्रशांत जाधव व मनोज सुतार यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे दुसरे कलाशिक्षण अधिवेशन कलाशिक्षण परिषद दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी २०२५रोजी पंढरपूर येथे होत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कलाक्षेत्रात भरीव उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आजी-माजी कला शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी दहा आजी- माजी कला शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार व २२ कला शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट्र शैक्षणिक कला शिक्षक संघाची पुरस्काराची यादी संघटनेचे अध्यक्ष शेर शहा डोंगरे, सरचिटणीस शाही ग्राम भिरुड यांनी जाहीर केली आहे.
यामध्ये कोल्हापुरातील नेहरू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व चित्रकार शिवाजी मस्के, प्रायव्हेट हायस्कूलचे कलाशिक्षक चित्रकार प्रशांत जाधव इचलकरंजीच्या शहापूर हायस्कूलचे कलाशिक्षक चित्रकार मनोज सुतार यांना हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हे तीन चित्रकार कलाशिक्षक कला नगरीमध्ये कला शिक्षणाचे कार्य केले आहे . ठिकठिकाणी त्यांची चित्र प्रदर्शन प्रदर्शित झाली आहेत . अनेक कला कार्यशाळेत चित्र प्रात्यक्षिके झाली आहेत. चर्चासत्रात सहभाग असतो.