शिवसेनेच्या तरुण नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टी ! सचिन पाटलांची नाळ समाजकार्याशी जुळलेली! !
schedule04 Feb 26 person by visibility 104 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वास पाटील या तरुण नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टी आहे. लोकांसाठी काम करण्याची तळमळ आहे. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील व त्यांचे कुटुंबीय अनेक वर्षे समाजकारण, राजकारण, सहकारक्षेत्रात आहे. समाजाच्या सुखदु:खात सहभागी होणारे हे कुटुंब असून आताच्या निवडणुकीत सचिन पाटील यांना निवडून देण्याचा आमचा निर्णय पक्का आहे अशी मते या मतदारसंघातील मतदारांनी व्यक्त केल्या.
हनुमान दूध संघाचे चेअरमन बुद्धिराज पाटील – पाडळी खुर्द जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन पाटील यांच्याकडे राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील कामाचा वारसा आहे. गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा या पंचक्रोशीत प्रभाव आहे. त्यांनी गोकुळ, स्थानिक स्वराज्य संस्था व कारखानदारी अशा विविध क्षेत्रात काम करताना लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा वारसा पुढे चालविणाऱ्या सचिन पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
कुंभी कारखान्याचे संचालक सर्जेराव हुजरे – पाडळी खुर्द जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत. शिवसेनेला अतिशय चांगले वातावरण आहे. प्रचारफेरीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात अग्रभागी आहेत. या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. पाडळी खुर्द जिल्हा परिषद व शिरोली दुमाला पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार तरुण आहेत. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे.
सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत पाटील – पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सचिन पाटील हा तरुण चेहरा आहे. त्यांच्याकडे सरपंचपदी काम करण्याचा अनुभव आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्याची धमक आहे. आमदार चंद्रदीप नरके यांची यंत्रणा प्रचारात सक्रिय आहे. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा समाजकारणाचा वारसा सचिन पाटील खंबीरपणे पुढे चालवित आहेत. लोकांसाठी काम भरपूर आणि गाजावाजा कमी अशी त्यांच्या कामाची पध्दत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ते निश्चित विजयी होतील.
युवराज पाटील महे – पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन पाटील हे तरुण आहेत. विकासात्मक दृष्टी आहे. यापूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मतदारसंघातील लोकांच्या आशा, अपेक्षांची जाणीव आहे. त्यांच्या प्रचारफेरीला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार याची खात्री आहे.
सर्जेराव पाडूंरंग पाटील, सचिव हनुमान विकास सोसायटी गाडेगोंडवाडी – गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी शेतकरी व दूध उत्पादकांचे हित डोळयासमोर ठेवून काम केले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविताना सचिन पाटील यांनी आपल्यातील नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत.रयत खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांच्या कामाची वेगळी ओळख करुन दिली आहे. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना अतिशय पोषक वातावरण आहे.
दत्तात्रय हुजरे – गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या संस्कारात सचिन पाटील यांची जडणघडण झाली आहे. विविध क्षेत्रात ते सक्रिय आहेत. आबाजींचा संपर्क, लोकांसाठी काम करण्याची भूमिका, आमदार चंद्रदीप नरके यांची यंत्रणा, भागातील विकासकामे या बळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निश्चित विजयी होतील. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सचिन पाटील यांनी वैयक्तिक संपर्क साधत मतदारांपर्यंत पोहोचले आहेत.