कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंका
schedule03 Feb 26 person by visibility 72 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सच्या वतीने ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स’ पिथंपुर,मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावरील एस.ए.ई - ई-बाहा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये केआयटीला एकूण ३ गटात यश मिळाले. यामध्ये स्लेज पूल - राष्ट्रीय स्तरावरील तिसरा क्रमांक, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स- राष्ट्रीय स्तरावरील ९ क्रमांक व एक्सेलरेशनला राष्ट्रीय स्तरावरील १२ क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये सहभागी होताना केआयटीने विद्यार्थ्यांना १५ लाख रुपयाचे सहकार्य केले.
या स्पर्धेत देशभरातून अग्रमानांकित आय.आय.टी, एन.आय.टी.शासकीय,खाजगी अभियांत्रिकी कॉलेजेस, खाजगी विद्यापीठे अशा देशभरातील जवळपास ९४ महाविद्यालयांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. मुख्यत्वे करून या स्पर्धेमध्ये विद्यार्थी इलेक्ट्रिक ऑफ रोड वाहनाचे वाहनाचे डिझाईन, उत्पादन, चाचणी, सुरक्षितता, टीम बिल्डिंग, प्रकल्प व्यवस्थापन आणि खर्चाचे नियोजन अशी कौशल्ये विकसित करण्यावरती या स्पर्धेमध्ये भर देण्यात येतो.
विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांचा विकास करणारी व त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या क्षमतांना आव्हान देणारी ही स्पर्धा होती असे मनोगत केआयटीचे या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. आसिफ कुरेशी यांनी व्यक्त केले. परिसरातील विविध उद्योजकांनी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बहुमोल तांत्रिक मार्गदर्शन,सहकार्य व आर्थिक योगदान केले अशा भावना केआयटीच्या टीमचा प्रमुख गौरव भिऊंगडे यांनी व्यक्त केल्या. आमचे स्वतःचे कौशल्य यामुळे विकसित झाले आहे. तसेच आधुनिक ई-बाईक च्या विषयातील आमच्या कल्पनांचे योगदान आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने सादर करता आले असा आत्मविश्वासपूर्वक अनुभव सह-प्रमुख साद अत्तार याने व्यक्त केला.
केआयटी आपल्या विद्यार्थ्यांना सातत्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेच्या निमित्याने जाण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असते नुसतेच प्रोत्साहित नाही तर त्यासाठी लागणारे आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांना देत असते.ज्यामुळेच केआयटीचा अशा स्पर्धांमध्ये यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे अशा भावना केआयटी चे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ उदय भापकर, संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन ,सचिव दीपक चौगुले अन्य विश्वस्तांचे प्रोत्साहन मिळाले. स्पर्धेच्या ठिकाणी प्रा.शाम अडेपल्ली यांनी मार्गदर्शन केले.