शुक्रवारी शाळा सुट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
schedule04 Feb 26 person by visibility 195 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाकरिता ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, त्या शाळांना शुक्रवारी सहा फेब्रुवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केली नाही त्या शाळा शुक्रवारी, सहा फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत होईल असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले आहेत. तसेच मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवारी, सात फेब्रुवारी रोजी सुटटी असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मतदान पथकात नियुक्ती केली आहे त्यांनी शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरुन होणारे साहित्य वाटप ताब्यात घ्यावे असे आदेशात म्ह्टले आहे. मतदान साहित्य घेऊन ते सकाळी ११.३० वाजल्यापासून मतदान केंद्रावर पोहोचतील असेही म्हटले आहे