Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

जाहिरात

 

डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिप

schedule03 Feb 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल एफआयसीपी फेलोशिप (फेलो ऑफ इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन) ने सन्मानित करण्यात आलेअसोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (.पी.आय.)च्यावतीने पटणा येथे आयोजित ८१व्याअॅपीकॉनराष्ट्रीय वार्षिक परिषदेमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला.

ही राष्ट्रीय परिषद २९ जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पटना (बिहार) येथील सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.  ‘अॅपीकॉनही जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित वैद्यकीय परिषदांपैकी एक असून या परिषदेत देश-विदेशातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते

 डॉ. ख्यालप्पा यांनीहेमोडायलिसिस इंड्यूस्ड हायपोग्लायसेमिया अँड करेक्टिव मेजर्सया विषयावर मार्गदर्शन केलेडॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिनेश चंद्र राय यांच्या हस्ते डॉ. ख्यालप्पा यांना गौरविण्यात आलेयावेळी .पी.आयचे अध्यक्ष जे. नरसीमुलू, डीन डॉ. दिनेश माथुर यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाचे मानदंड प्रस्थापित करणाऱ्या देशातील निवडक डॉक्टरांनाच दिला जातो.  डॉ. ख्यालपा यांच्या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे  कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणालेडॉ. ख्यालप्पा यांनी रुग्णसेवा, अध्यापन आणि प्रशासन या सर्वच पातळीवर अतिशय चांगेल काम केले आहे. त्यांच्या या यशामुळे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचाही गौरव झाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes