Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

जाहिरात

 

घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान 

schedule03 Feb 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील इयत्ता सहावीतील रुही भंडारी व इयत्ता दहावीतील सृजनी हलदार या विद्यार्थिनींची  'राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान'साठी निवड झाली.  त्यांनी हिंदी विषयात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले व त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रतिभा सन्मानासाठी करण्यात आली. हिंदी विकास संस्थान, दिल्ली यांच्या मार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ–२०२५ अंतर्गत ३० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन, प्रधानमंत्री संग्रहालय येथे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हिंदी विषय शिक्षिका ज्योती मस्के यांना शिक्षक प्रशस्तीपत्र व प्राचार्य अस्कर अली यांना प्रधानाचार्य गौरव सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती,  प्राचार्य अस्कर अली, शिक्षक व पालकांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले.  "हिंदी भाषेच्या अध्ययनात सातत्यपूर्ण परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे मत संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes