+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Oct 22 person by visibility 946 categoryशैक्षणिक
वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध, शिक्षक समिती कोल्हापूर शाखेतर्फे आंदोलन
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या, वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षकांनी मूक धरणे आंदोलन केले. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात दोन ऑक्टोबर रोजी सत्याग्रही मार्गाने शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत शाळा वाचविण्यासाठी आवाज उठविला.
प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर, महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वर्षा केनवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पापाची तिकटी येथील महात्मा गांधी याच्या पुतळा परिसरात आंदोलन झाले. ‘ज्ञान हाच तिसरा डोळा-माझ्या गावात माझी शाळा, बहुजनांच्या शिक्षणावर सरकारचा डोळा-कायदा मोडून बंद होताहेत वस्तीवरच्या शाळा,”असा मजकूर असलेले फलक हाती घेउन शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.
आंदोलनात जोतिराम पाटील, हिंदुराव परीट, गणपती मांडवकर, सतीश बरगे, सर्जेराव पोवार, संजय जितकर, तुषार चोपडे, हर्षल जाधव, अर्जुन जानकर, राजेश सोनपराते, प्रशांत शिंदे, राजेंद्र पाटील, पांडूरंग आयरेकर, मधुकर पाटील, रामदास झेंडे, संतोष वणकुद्रे, तुकाराम मातले, शांताराम कोंदले, चेतन डवरी, एस. पी. पाटील, दिलीप पाटील, शशिकांत धुत्रे, शरद केनवडे, सुरेश कोळी, हरिदास वर्णे, संजय जितकर, संजय कुंभार, भिमराव पाटील, सतीश जयकर, शब्बीर मोमीन, युवराज पाटील, राजीव परीट, रघुनाथ गोसावी आदींचा सहभाग होता.