तेच प्रेम…तोच पाठिंबा… आमची नाळ जनतेशी जुळलीय ! अण्णांची स्वप्नं सत्यजीत पूर्ण करणार- जयश्री जाधव
schedule10 Jan 26 person by visibility 49 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची समाजातील प्रत्येक घटकांशी नाळ जुळली होती. त्यांनी, निस्वार्थपणाने अनेक घटकांना मदत केली. आण्णांच्या समाजकार्याचा वारसा आम्ही पुढे चालवितोय. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी जी स्वप्नं पाहिली होती, ती स्वप्नं सत्यजीत जाधव पूर्ण करतील. मंगळवार पेठेशी आमचं वेगळं नातं आहे…लोकांनी, चंद्रकांत आण्णावर प्रेम केलं. माझ्यावर प्रेम केलं... तोच पाठिंबा... तेच प्रेम सत्यजीत जाधव यांच्यावरही करावं.’अशी भावनिक साद शिवसेनेच्या उपनेत्या आणि माजी आमदार जयश्री जाधव यांनी घातली.
प्रभाग क्रमांक ११ मधून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार जाधव या प्रभागात प्रचारफेरी काढत आहेत. लोकांशी संपर्क साधत आहेत. मंगळवार पेठेतील त्यांच्या प्रचारफेरीला लोकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद लाभता. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव व माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजीत जाधव हे प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहेत. सत्यजीत जाधव हे युवा उद्योजक आहेत. समाजातील विविध घटकांशी संबंधित आहेत.
प्रचारानिमित्त मंगळवार पेठेतील नागरिकांची संवाद साधताना माजी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘आमच्या घराण्यावर अनेक लोकांनी प्रेम केले. मला निवडून दिलं. मंगळवार पेठेशी आमचं एक वेगळं नातं आहे. चंद्रकांत जाधव यांनी निस्वार्थभावनेने सामाजिक काम केलं, समाजाची सेवा केली. ते प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे होते. जनतेनेही आमच्यावर भरभरुन प्रेम केले. नागरिकांनी अण्णांना आमदार केलं. मला नगरसेवक बनविलं. पोटनिवडणुकीत आमदार केले.तेच प्रेम,तोच पाठिंबा आताही महापालिका निवडणुकीत पाहावयास मिळत आहे. समाजकार्याचा वारसा सत्यजीत जाधव सक्षमपणे पुढे चालवित आहेत. अण्णांची समाजकार्याची अधुरी स्वप्नं सत्यजीत पूर्ण करणार याचा विश्वास आहे. महापालिका निवडणुकीत लोकांचा मिळणारा प्रतिसाद प्रचंड सकारात्मक आहे. लोक आमच्या पाठीशी आहेत.’