प्रभाग सतरामध्ये जनसुराज्यची माघार, काँग्रेसला पाठिंबा
schedule10 Jan 26 person by visibility 84 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शनिवारी कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 17 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार ज्योती कमलाकर भोपळे यांनी माघार घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. ज्योती भोपळे या माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांच्या पत्नी आहेत. कमलाकर भोपळे हे पूर्वी भारतीय जनता पक्षात होते. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाले नाही म्हणून त्याने अंतिम टप्प्यांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली. जनसुराज्यशक्ती पक्षाने भोपळे यांच्या पत्नी ज्योती यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी प्रचार ही सुरू केला होता. येत्या 15 मे रोजी महापालिकासाठी मतदान होत आहे. मात्र त्या अगोदरच शनिवारी ज्योती भोपळे यांनी माघार घेत काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक कमलाकर भोपळे आणि काँग्रेसचे उमेदवार प्रवीण केसरकर यांची भेट घेऊन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे सांगितले.