जागतिक दर्जाच्या संशोधनाकडे वाटचाल करा - डॉ. विनायक पारळे
schedule10 Jan 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर संशोधनाचा विचार केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय संशोधन संधींचा लाभ घेतल्यास ज्ञान, कौशल्य आणि दृष्टीकोन अधिक व्यापक होतो," असे प्रतिपादन जपान मधील हिरोशिमा विद्यापीठाचे प्रा. डॉ.विनायक पारळे यांनी केले. ते शहीद महाविद्यालयात आयोजित विदेशातील संशोधन संधी या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
डॉ. पारळे यांनी आपल्या व्याख्यानात कोरिया जपान यांसारख्या देशांमधील संशोधन व्यवस्था, आधुनिक प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि उपलब्ध फेलोशिप संधी यांची सविस्तर माहिती दिली. संशोधन संस्कृती, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानाधारित अभ्यास यावर त्यांनी प्रकाश टाकला. संशोधन ही केवळ वैयक्तिक प्रगतीची प्रक्रिया नसून समाज आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, सातत्य आणि चिकाटी ठेवून संशोधन क्षेत्रात काम केले पाहिजे असे डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले.
प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक म्हणून प्रा.विशालसिंह कांबळे यांनी भूमिका पार पाडली. प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा.दिग्विजय कुंभार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.