Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !! जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोषजिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर कारवाईची मागणीतीन महिन्यात तीन अध्यक्ष, गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावेसंस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हाविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरे

जाहिरात

 

महानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशन

schedule11 Jul 25 person by visibility 1213 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक विषयावर आधारित, कृषीक्षेत्रांशी नातं जोडणाऱ्या, राजकीय घडामोडीवर भाष्य करणाऱ्या आणि मानवी भावभावनांचे विविध कंगोरे टिपणाऱ्या ‘घुंगुरमाळा’या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (१२ जुलै २०२५) कोल्हापुरात होत आहे. कवयित्री महानंदा मोहिते यांचा हा कवितासंग्रह आहे. या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज भूषविणार आहेत. शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉल  येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होत आहे.

या कार्यक्रमासाठी साहित्यिक श्रीराम पचिंद्रे हे प्रमुख पाहुणे आहेत. समीक्षक डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख वक्ते तर माई पब्लिकेशन्सच्या ममता सिंधुताई सकपाळ, प्रकाशक पूजा भडांगे यांची प्रमुख उपस्थिती आहे. दरम्यान मोहिते यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. या कवितासंग्रहात विविध विषयावरील ७७ कविता आहेत. कॉलेज जीवनापासून मोहिते यांना लिखाणाची आवड. त्यांच्या कविताही विविध अंकात, नियतकालितकेत प्रसिद्ध झाल्या आहेत. २०१८ ते २०२५ या कालावधीतील कवितांचा समावेश आहे. सामाजिक, कृषी क्षेत्राशी निगडीत, राजकारण, मानवी नातेबंध अशा विविध विषयावरील कविता हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. ममता सकपाळ यांनी प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यांच्या प्रकाशन संस्थेतर्फे ‘घुंगुरमाळा’ हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. या समारंभास साहित्यप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes