राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रम
schedule26 Jul 26 person by visibility 18 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक आश्रम विद्यालयात लहान मुलांना वारकरी पोशाख, व खाऊ वाटप करण्यात आले. जनसेवा सप्ताह अंतर्गत विद्या मंदिर बामणी येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पदाधिकारी सुमित पाटील, चिरायू संकपाळ, संकेत चितारी धीरज पाटील, तेजस चौगुले, गौरव बोबाटे, शर्विल सामंत, रोहीत पाटील, विनायक घाटे यांचा सहभाग होता.