Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमले

जाहिरात

 

खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलन

schedule27 Jul 26 person by visibility 12 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह चालविण्यासाठी खासगी कंपनीला देण्याला रंगकर्मीनी कडाडून विरोध केला. महापालिकेने तो निर्णय मागे घ्यावा यासाठी रंगकर्मीतर्फे २८ जुलै २०२६ रोजी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रंगकर्मीच्या बैठकीत हा निर्णय झाला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलन करण्याचे ठरले. या बैठकीत सर्वच रंगकर्मीनी नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध केला. अभिनेता आनंद काळे, स्वप्निल राजशेखर, भरत दैनी, प्रसाद जमदग्नी, किरणसिंह चव्हाण, सुनील घोरपडे, पद्माकर कापसे, मिलिंद अष्टेकर, पंडित कंदले, उमेश पोवार आदी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेनेही आंदोलनाला पाठिंबा दिला.  शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे यांनी नाट्यगृहाच्या खासगीकरणाला विरोध करत आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes