जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी स्वप्निल घस्ते
schedule26 Jul 26 person by visibility 62 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी स्वप्निल प्रभाकर घस्ते यांची निवड करण्यात आली . घस्ते हे वरिष्ठ सहाय्यक म्हणून पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद येथे कार्यरत आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने सहकारामधील उल्लेखनीय कारभाराबाबत नावलौकीक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात भरीव वाढ करणेकामी निश्चित नियोजनबद्द काम करणेची ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली. या निवडीवेळी संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील, व्हाइस चेअरमन-जयकुमार रेळेकर, सर्व संचालक मंडळ व संस्थेचे मार्गदर्शक उपस्थित होते.