Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफशिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाविद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठ

जाहिरात

 

जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफ

schedule27 Jul 26 person by visibility 31 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य हे लोकप्रतिनिधीच आहेत. आपण स्वतः व पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे एकत्रित बसून जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामांविषयक लवकरच समाधानकारक निधी वितरीत करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ७० : ३० टक्के फॉर्म्युलाबाबत चर्चा आहे. मात्र अधिकाधिक निधी देताना सदस्यांचा सन्मान राखला जाईल असे मुश्रीफ म्हणाले.
   राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंती दिनानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे सभागृहात वैरण बियाणे वाटप व विविध वैयक्तिक लाभांच्या योजना वितरणप्रसंगी ते बोलत होते.ा्र जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, बांधकाम समिती सभापती सरिका नांदेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, अर्थ व शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील  आसुर्लेकर आदी उपस्थित होते. राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात हा कार्यक्रम झाला.
        मुश्रीफ म्हणाले,स्वर्गीय अजित पवार यांना कोल्हापूर विषयी अतिशय जिव्हाळा होता.त्यांच्या प्रयत्नांनी कोल्हापूरात अनेक विकास विषयक कामे मार्गी लागली. कोल्हापूरवासियांना पिण्याचे चांगले व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी त्यांनी काळमवाडी धरणातून थेट पाणी पाईपलाईन योजना राबविली. कोल्हापूर जिल्हा परिषदेला आपले संपूर्ण सहकार्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली  मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी संबंधित लाभार्थ्यांना उच्च प्रतीचे मका व ज्वारी बियाणे, दळणयंत्र,शिलाई मशिन्स,कडबाकुट्टी मशिन्स,स्प्रे पंप,विद्यार्थ्यांना सायकल,लॅपटॉप,झेरॉक्स मशिन्स यांच्यासह इतर अनेक लोकोपयोगी वस्तूंचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. बांधकाम व आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा दिला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर, एकनाथ पाटील, अभिजीत तायशेटे, शिवाजी जाधव, इंद्रजीत पाटील, अमृता डोंगळे, अर्चना चौगले आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes