रमाईच्या त्यागामुळेच सारा समाज आनंदात- डॉ. प्रवीण कोडोलीकर
schedule07 Feb 25 person by visibility 169 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीला आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांनी सुद्धा त्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे; त्यामुळेच सारा समाज संविधानाच्या माध्यमातून आनंदात आहे,’ असे प्रतिपादन आजी-माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी केले.
विचारे माळे येथे निळा रक्षकतर्फे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. कोडोलीकर बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले, ‘एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी पत्नीचा त्याग सुद्धा महत्त्वाचा असतो. रमाई यांनी अनेक हालअपेष्टा सहन करत बाबासाहेब यांना कायमच पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही.’ कार्यक्रमाला अनिल भोसले, अनिल माने, विराज सुतार, राहुल शिंदे, नितिन शिंदे, निलेश शिंदे, रोहन वाघमारे, सतिश साळवे, राजू भंडारे आदी उपस्थित होते.