+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule22 Aug 24 person by visibility 888 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोलकाता ,बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना कोल्हापूर शहराजवळील शिये येथे उसाच्या शेतामध्ये दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला. मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पार्श्वभूमीवर  गुरुवारी कोल्हापुरात सन्मान योजना कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा सुरू असतानाच कोल्हापूर शहराजवळील शिये गावात दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली . पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने सुरू केली आहेत. एका संशयितला ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. पण या वृत्ताला पोलीस प्रशासनाने अ दुजोरा दिलेला नाही. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.