राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ४९ नगरसेवकांची निर्दोष मुक्तता
schedule23 Dec 25 person by visibility 52 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची वीस फेब्रुवारी २००६ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आक्षेप ठेवत कोर्टात ५७ नगरसेवकांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मेजर संजय शिंदे यांनी राष्ट्रगीत अवमान प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. १९ वर्षे हे प्रकरण कोर्टात सुरू होते. दरम्यान राष्ट्रगीत अवमान प्रकरणी दाखल केलेली केस शाबित न झाल्यामुळे तत्कालीन 57 नगरसेवकांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून राष्ट्रगीत अवमान आरोप प्रकरणी साऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी गादिया यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी निकाल दिला. नगरसेवकांच्यावतीने अॅड. हर्षा खंडेलवाल, गजानन कोरे, के पी राणे, पी डी सामंत, व व्ही व्ही पाटील यांनी काम पाहिले. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, प्रकाश पाटील, राजू आवळे, सागर चव्हाण, राजू कसबेकर, रफिक मुल्ला, अशोक जाधव, तुकाराम तेरदाळकर, विजय साळोखे सरदार, सतीश घोरपडे, ईश्वर परमार, संभाजी देवणे, संजय चौगुले आदी उपस्थित होते. दरम्यान ५७ पैकी आठ नगरसेवक मयत आहेत. ४९ नगरसेवकांची निर्दोष मुक्त्तता झाली.