Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इंडिया आघाडीतून आप बाहेर, महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारामहापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात निश्चित , कोल्हापूर- इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणून लढणार : सतेज पाटील संगीता पोवार चालविणार पोवार कुटुंबीयांचा समाजकार्याचा वारसा निकालानंतर कागलात वादाचे फटाके, मंडलिक-मुश्रीफ आमनेसामने !कोल्हापूरच्या चित्रकारांच्या कलाकृतीचे मुंबईत प्रदर्शनतुटलेली दोरी पुन्हा बांधता येते, मुश्रीफ यांच्या विधानावर सतेज पाटलांचे मिश्किल उत्तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभारांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान दौड, १२०० स्पर्धकांचा सहभाग राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 67 जणांनी मागितली उमेदवारी, 39 इच्छुकांच्या मुलाखती मुरगूडमध्ये मंडलिकच, कागल मुश्रीफ-समरजितचे, पन्हाळयाचा गड कोरेंचा, जयसिंगपुरात यड्रावकरच ! गडहिंग्लजमध्ये कोरे पराभूत, शिरोळमध्ये अशोक मानेंना झटका ! !शिवसेनेकडे उमेदवारांची तगडी फौज ! राष्ट्रवादीतही वाजतगाजत मुलाखती ! !

जाहिरात

 

इंडिया आघाडीतून आप बाहेर, महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा

schedule23 Dec 25 person by visibility 34 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत असलेल्या आम आदमी पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा दिला आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी आम आदमी पक्षाने काँग्रेसकडे जागेचा प्रस्तावा दिला होता मात्र काँग्रेसकडून जागा वाटपावरून समाधानकारक चर्चा होत नाही तसेच झुलवत ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे सांगितले तसेच महापालिकेच्या निवडणुकीत  आम्ही ताकतीने उतरू समविचारी कार्यकर्ते व पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवू असे आमचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. महापालिका निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. राजकारणातील घराणेशाही मोडीत काढण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही देसाई यांनी सांगितले.

 आम आदमी पक्षाला गृहीत धरून काँग्रेसचे कारभारी चर्चा करत होते केवळ झुरवत ठेवण्याचा प्रकार सुरू होता एक तारखेपर्यंत चर्चा करू असे म्हणत त्यांनी टोलवाटोलवी  सुरू केली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याशी आपले काही वैर नाही मात्र त्यांच्या बगलबच्चांची आता खैर नाही असा इशाराही त्यांनी दिला. एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हणायचं, तर दुसऱ्या बाजूला घराणेशाहीला खतपाणी घालत धनाढ्य उमेदवारांना प्राधान्य द्यायचं असं दुटप्पी धोरण प्रस्थापित पक्षांनी राबवलं आहे. गेले दोन आठवडे महाविकास आघाडीसोबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. आप ने सुरुवातीला दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील सात जागंवर चर्चा करण्याची तयारी काँग्रेसच्या समितीने दाखवली होती. परंतु एक आणि दोन जागांवर आम्ही तुमचा विचार करू असा निरोप आल्याने आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का अशी भावना तीव्र असताना आप ने मात्र कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. 

लोकसभा, विधानसभेला आम्ही आघाडीचे काम प्रामाणिकपणे केले. महापालिका निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी म्हणून लढूया असा प्रस्ताव खुद्द काँग्रेसने दिला होता. परंतु मित्रपक्षांना फक्त गरजेपुरते वापरा आणि परतफेड करायची वेळ आली कि, निवडणुकीच्या निकषांमध्ये तुम्ही बसत नाही असे म्हणत फेकून द्यायचे असे धोरण काँग्रेस वापरत असल्याची घणाघाती टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली. आम आदमी पार्टी महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes