महापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात निश्चित , कोल्हापूर- इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणून लढणार : सतेज पाटील
schedule23 Dec 25 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. येत्या दोन दिवसात जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर होईल असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि महाविकास आघाडी यांनी संयुक्तपणे निवडणूक लढवावी यासंदर्भातील फोन आला होता असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले
कोल्हापूरचा विकास जनतेच्या सहभागातून व्हावा या उद्देशाने “ कोल्हापूर कस्सं ? तुम्ही म्हणशीला तस्सं! ” हे अभियान कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत लोकांच्या शहर विकासाच्या अपेक्षा व सूचना विचारात विचारात घेतल्या जाणार आहेत आणि जाहीरनामा तयार करताना त्यामध्ये त्या सूचनांचा समावेश केला जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले जिल्हा काँग्रेस कमिटीत मंगळवारी या अभियानचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्यासोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. इचलकरंजी येथेही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्यासाठी चर्चेच्या पाच बैठका झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला निश्चित होईल आणि तो जाहीर करण्यात येईल. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. इच्छुकांची संख्या मोठी आहे. ज्यांना उमेदवारी देऊ शकणार नाही त्यांनी काँग्रेसचा प्रचार करावा. महाविकास आघाडीचे उमेदवार सोबत राहणार असल्याचे सगळ्यांनी असेही आमदार पाटील म्हणाले. कोल्हापूरच्या सर्वंकष विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विकसित कोल्हापूर हे आमच्या अजेंड्यावर आहे. टक्केवारीमुक्त महापालिका, खड्डेमुक्त कोल्हापूर आणि सर्व सुविधायुक्त कोल्हापूर यावर आमचा फोकस आहे. मी पालकमंत्री असतानाच शेंडा पार्क येथे आयटी पार्क साठी जागा आरक्षित करण्यात आली होती. आयटी पार्कला चालना देण्यासाठी आम्ही एक खिडकी योजना राबवू तसेच आयटी पार्कसाठी इतर शहरांमध्ये जास्त सुविधा दिल्या जातात त्यास सुविधा कोल्हापुरातील मिळायला हव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
महापालिकेत गेली पाच वर्षे प्रशासक राजवट आहे. कारभार थेट सरकारच्या हातात आहे. एका अर्थी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हातातच महापालिका होती. मात्र गेल्या पाच वर्षात शहराची दुर्दशा झाली आहे टक्केवारीचा कारभार, खड्ड्यांची समस्या, वाहतूक व पार्किंगचे प्रश्न अशा अनेक अडचणी शहरवासीयांना भेडसावत आहेत. या साऱ्या प्रश्नावर मात करून विकसित कोल्हापूर हा आमचा अजेंडा आहे. त्या अनुषंगाने आम्ही कारभार करू महाविकास आघाडीतर्फे जाहीरनामा तयार करताना लोकांच्या सूचना मागवू. जाहीरनाम्यात त्या सूचनांचा समावेश करू. कोल्हापूरचा विकास जो लोकांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने विकास साधू. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तस या पद्धतीने आमचा कारभार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले
खासदार शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. युवराज मालोजीराजे हेही आमच्यासोबत आहेत असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार शाहू महाराज म्हणाले महाविकास आघाडीला कोल्हापुरात अनुकूल वातावरण वातावरण आहे निश्चितच निवडणुकीत दमदार कामगिरी होईल. लोकांच्या विकासाला प्राधान्य देणारा कारभार राहील. पत्रकार परिषदेला माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर भीमराव पोवार, सरला पाटील, बाळासाहेब सरनाईक, आनंद माने, दौलत देसाई, महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, भारती पोवार, मधुकर रामाने प्रतापसिंह जाधव, राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, ईश्वर परमार, विनायक फाळके, तोफिक मुलानी, दुर्वास कदम, अमर समर्थ, रियाज सुभेदार, शिवानंद बनसोडे, धीरज पाटील, फिरोज सौदागर, भरत रसाळे आदी उपस्थित होते.