संविधान जात मानत नाही, मग साहित्याला जात कशी ? – डॉ. श्रीपाल सबनीस
schedule08 Feb 25 person by visibility 148 categoryसामाजिकजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “भारताचे संविधान जात मानत नाही, मग साहित्याला जात कशी असू शकते? जातीय व्यवस्थेपेक्षावर जाऊन निखळ मनाने प्रकट होणारे साहित्यच उदात्त आणि पवित्र असते. साहित्य हे माणसाला जोडणारे असावे, विभाजन करणारे नाही.’’असे मत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे आयोजित ४३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केल होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.याप्रसंगी बोलताना सबनीस यांनी लेखक, कवी आणि अभ्यासक हेच खरे परिवर्तन घडवणारे असतात. इतिहासातील प्रत्येक उठावाच्या मागे साहित्यिक, कवी किंवा एखादा अभ्यासक असतो, कारण समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये आहे.’असे नमूद केले.
संमेलनाचे उद्घाटक ओम प्रकाश शेटे म्हणाले, माणसे जोडणे महत्त्वाचे आहे सामान्य माणसे ही सर्वात मोठी संपत्ती आहे. साहित्य संमेलनाचा राजकारणातील दरारा नवीन साहित्यामुळे कमी झाला आहे तो वाढवणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा ४५० विद्यापीठात शिकवली जाणार आहे व अनेक मराठी संस्थांना पाठबळ मिळणार आहे.
यावेळी स्वागताध्यक्ष डॉ.दिनकर पाटील व डॉ महादेव सगळे, रघुराज मेटकरी यांनी विचार मांडले. डॉ. ऋषिकेश मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योत्स्ना मेटकरी,चंदना तामखडे यांनी सूत्रसंचालन केले. तात्यासाहेब शेंडगे यांनी आभार मानले. रवींद्र बेडकीहाळ अॅड. सुभाष पाटील डॉ. मानाजी कदम, डॉ. प्रताप वलेकर, विनोद गोसावी, महेश शानबाग, डॉ गिरीश शरणाथे अब्बास मुलांनी, दत्ता खंडागळे, डी ए माने, शकुंतला पाटील, हृदयनाथ सावंत, बाळासाहेब पाटील, अरुण लंगोटे, ज्ञानेश्वर लाटणे, किसन जाधव, पांडुरंग शितोळे उपस्थित होते