Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच हवे, पाचवीपासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही –शरद पवारशक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनधनंजय महाडिकांसहित भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादनतळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- डॉ.जब्बार पटेलजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम करुन व्यक्तिमत्वाची उंची वाढवावी-प्रकाश आबिटकरलग्नात रुखवतासोबत पुस्तकाचे कपाट, अक्षताबरोबर राजर्षी शाहूंचे पुस्तक द्या– डॉ. जयसिंगराव पवारशिरीष सप्रे म्हणजे जगतमित्र, माणसं जोडणारे सुसंवादी व्यक्तिमत्व -शरद पवारांनी जागविल्या आठवणीकोल्हापुरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट गोकुळमध्ये राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती साजरीशक्तीपीठ महामार्गप्रश्नी मुश्रीफ, आबिटकरांच्या मंत्रीमंडळातील भूमिकेवर साशंकता-सतेज पाटलांचा हल्लाबोल

जाहिरात

 

गोकुळमध्ये राजर्षी शाहू महाराजांची १५१ वी जयंती साजरी

schedule26 Jun 25 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी  शाहू महाराज यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात आली. गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळयाचे पूजन करण्यात आले.           

चेअरमन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक क्रांतीकारक नेतृत्व होते. बहुजन समाजाला शिक्षण, हक्क व स्वाभिमान देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शाहू महाराजांच्या विचाराने सुरु असलेल्या सहकार व दुग्ध व्यवसायाचा पाया आज गोकुळच्या रूपाने बळकट झाला आहे. गोकुळ संघ हा त्यांच्या चिरंतन विचारांचा पाईक आहे.

  याप्रसंगी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया, मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंके, डॉ.प्रकाश दळवी, संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, डॉ.विजय मगरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes