धनंजय महाडिकांसहित भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
schedule26 Jun 25 person by visibility 103 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक व भाजपा पदाधिकाऱ्यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे जाऊन अभिवादन केले. त्यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
दरम्यान कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शाहू जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. पुरातत्व विभाग आणि वस्तू संग्रहालय संचालनालय तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरस्थळी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांह भेट दिली. दरम्यान सृजन आनंद विद्यालयाच्या ३६ मुलांना, आज राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाची सहल घडवण्यात आली. या ठिकाणी उभारलेली राधानगरी धरणाची प्रतिकृती, राजर्षि शाहू महाराजांची बग्गी यासह विविध गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे अध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, अजित ठाणेकर, किरण नकाते, प्रदिप उलपे, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे, उदय शेटके, संग्राम निकम, शैलेश पाटील, युवराज माने, विराज चिखलीकर, डॉ. सदानंद राजवर्धन, संग्राम जरग, अमोल पालोजी, महेश वासुदेव, माधुरी नकाते, गायत्री राऊत धनश्री तोडकर, विशाल शिराळकर, अमर साठे, रवीकिरण गवळी, अमित पसारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राजर्षि शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केले.
दरम्यान याच वास्तूमधील एका छोटेखानी थिएटरमध्ये राजर्षि शाहू महाराजांवरील ध्वनी चित्रफित सादर झाली. होता. यावेळी हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, सचिन पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान श्रम फौंडेशनच्यावतीने, खासदा महाडिक यांच्या हस्ते, महापुरूषांवर लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सारंग, वैशाली सारंग, पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, सतिश माने उपस्थित होते.