गुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल भक्तीगीत कार्यक्रम
schedule02 Jul 25 person by visibility 46 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गुणीदास फाऊंडेशनतर्फे आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला शनिवारी (५ जुलै २०२५ ) सायंकाळी सहा वाजता ‘तीर्थ विठ्ठल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संस्थेचे आधारस्तंभ उद्योजक बापूसाहेब जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .गेली अनेक वर्षे सातत्याने अभंग आणि भावभक्ती गीतांच्या संगीताच्या वारीचे आयोजन गुणीदास फाऊंडेशन करीत आहे. यंदाच्या कार्यक्रमात गायक आदित्य मोडक, गायिका अंजली गायकवाड या कलाकारांच्या अभंग आणि भक्तिगीतांचा आस्वाद रसिकांना घेता येईल.
या कलाकारांना डॉ सचिन जगताप, केदार गुळवणी रोहित खवळे, स्वरूप दिवाण आशय कुलकर्णी या कलाकारांची साथसंगत लाभणार आहे. कार्यक्रमाचे निरुपन महेश्वरी गोखले या करणार आहेत.
गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे तरी जस्तितजास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कार्यक्रमास येताना वारकरी वेशभूषेत यावे असे गुणीदास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुस्मिता सप्रे, कार्यक्रम प्रमुख राजप्रसाद धर्माधिकारी आणि सेक्रेटरी. डॉ अजित शुक्ल यांनी केले आहे.