शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन, पोलिसांनी रोखले कार्यकर्त्यांना
schedule01 Jul 25 person by visibility 215 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर नजीकच्या पंचगंगा नदी पुलावर मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान जवळपास तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखली होती. दरम्यान आंदोलन सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते हे पंचगंगा नदी पुलावर पोहोचले. नदीमध्ये उडी टाकण्याचा प्रयत्नात होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. पोलिस व कार्यकर्ते यांच्यामध्ये काही वेळ झटापट झाली. दरम्यान पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाजूला केले. कोणालाही नदीमध्ये उडी टाकू दिले नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात होता पंचगंगा नदी पुलावर ही पोलीस बंदोबस्ताला होते. मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन पुकारले होते.