विद्यापीठातील औद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची निवड
schedule02 Jul 25 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सेंटर प्लेसमेंट सेल आणि रसायनशास्त्र विभागातर्फे एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्हमधून शिवाजी विद्यापीठातील ओद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची असिस्टंट केमिकल अनालायझर म्हणून निवड करण्यात आली. या कॅम्पस इंटरव्यू मध्ये सीएमएस सॉफ्टवेअर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे असिस्टंट केमिकल एनालायझर या पोस्टसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या मुलाखती फक्त एम एस सी द्वितीय वर्ष २०२५ पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच होत्या. यामध्ये औद्योगिक रसायनिक शास्त्र विभागाच्या पाच तर दोन सामान्य रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेंट्रल प्लेसमेंट चे समन्वयक डॉ. पडवळ, इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. अविराज कुळदीप, डॉ. राहुल माने, डॉ. जी. एस.राशिनकर, डॉ.के. डी. सोनवणे या सर्वांचे सहकार्य लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत मेटकर (औद्योगिक रसायनशास्त्र), सायली शिंदे (औद्योगिक रसायनशास्त्र), प्रणव आंबी (औद्योगिक रसायनशास्त्र), आशुतोष हंकारे (औद्योगिक रसायनशास्त्र), गणेश सदाकळे (औद्योगिक रसायनशास्त्र), अतिश कांबळे (सामान्य रसायनशास्त्र), नंदिनी जगदाळे (सामान्य रसायनशास्त्र) यांचा समावेश आहे.