Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्षपदी आनंद कुलकर्णीराष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोल्हापुरात शनिवारी बैठकउद्धव ठाकरेंची भेट, पण संजय पवारांची नाराजी कायम ! प्रामाणिकपणाचे फळ म्हणून जिल्हाप्रमुखपदी निवड-रविकिरण इंगवलेसावकार मादनाईक भाजपात दाखल, शिरोळमध्ये भाजपाला मिळाला नवा नेताविद्यापीठातील औद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची निवड आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डी. टी. शिर्के न्यू वूमन्स फार्मसीचा शंभर टक्के निकालरोहिणीदेवी जयवंतराव घाटगे यांचे निधनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

जाहिरात

 

आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डी. टी. शिर्के 

schedule02 Jul 25 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त आणि आर्थिक पारदर्शकता महत्त्वाची असते. आर्थिक साक्षरतेच्या मोहिमेत अर्थतज्ज्ञ, लेखकांची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः अलीकडच्या काळात वाढत असलेली आर्थिक फसवणूक विचारात घेता नागरिकांचे आर्थिक प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी व्यक्त केले. मराठी विश्व कोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य प्रा.संजय ठिगळे यांनी कुलगुरू शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य, समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांना ‘अर्थतरंग’ हे पुस्तक भेट दिले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.  प्र-कुलगुरू म्हणाले, अर्थसाक्षरतेशिवाय विकास शक्य नाही. विशेषतः तरुणाईने त्यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे. यावेळी प्रा. ठिगळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा समन्वयक म्हणून काम करीत असताना समाजाशी नाळ जोडली गेली. त्या अनुभवाचा फायदा लेखन करण्यासाठी झाला.  कुलसचिव शिंदे व समीक्षक प्रा. शिंदे यांनी प्रा. ठिगळे यांच्या समाज जागृतीपर लेखन उपक्रमाचे कौतुक केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes